अंदाज आरशाचा वाटे खरा असावा.
बहुतेक माणसांचा तो चेहरा असावा
काठावरी उतरली स्वप्ने तहानलेली
डोळ्यांत वेदनेचा माझ्या झरा असावा
जखमा कशा सुगंधी झाल्यात काळजाला
केलेत वार ज्याने तो मोगरा असावा
माथ्यावरी नभाचे ओझे सदा इलाही
दाही दिशा कशाच्या तो पिंजरा असावा
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment