suresh bhatachi kavita nehamich manala mohini ghalate. hatat ghetalel pustak ghali theavavese vatat nahi. aanamik dukha pratek kavitetun vyakt hot asate . mag kadhi 1 2 tas nighun jatat te lakshat sudha yet nahi.
स्मरायासारखा आता तसा मी राहीलो नाही
कहानी संपली माझी जरी मी बोललो नाही!
आता मागुन ही चर्चा!आता मागून ह्या शंका
कसा मी वागलो होतो?कसा मी वागलो नाही?
आता मी एकतो...तेहवा ज़रा झंकारलो होतो,
तसा झंकारतानाही कधी झंकारलो नाही!
आता खोटे जगायला निमित्ते शोधतो खोटी
असा आभास मी माझा...जसा मी जन्मलो नाही!
कशाला आठवू आता अवेळी मागची नाती?
...कधी ह्या अश्रूंनाही हवासा वाट्लो नाही!
अशी ही शेवटी माझ्या जीवांची संपली यात्रा-
जिथे मी भेट्लो होतो तिथे मी थांबलो नाही!

No comments:
Post a Comment